धरणगाव कोरोनामुक्तीच्या दिशेने; सात रूग्णांची कोरोनावर मात ( व्हिडीओ )

धरणगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढत आहे. यात धरणगाव तालुका आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून आज कोरोना विषाणूवर मात करणार्‍या येथील सात रूग्णांना टाळ्यांच्या कडकडाटात आणि गुलाबपुष्पांसह निरोप देण्यात आला.

धरणगाव शहरामध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यापैकी दोन महिला रुग्ण जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्या दोन महिला रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यापैकी उरलेले आठ रुग्ण धरणगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होते.त्यापैकी सलग दहा दिवसांपासून उपचार घेत असलेले सात रुग्ण आज बरे झाल्यामुळे व त्यांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी सोडण्यात आले. त्यांना घरी सोडताना गुलाबपुष्प, पेढे देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. घरी जाताना त्यांचे समुपदेशन करण्यात आले.तसेच त्यांना घरी जाताना चौदा दिवस होम क्वारंटाइन होण्यासंबंधी प्रशासनाने निर्देश दिले आहेत. कोविड केअर सेंटर धरणगाव येथे आता एक कोरोनाग्रस्त उपचार घेत आहे. या रुग्णालासुद्धा आज रोजी कोणतीही लक्षणे नाहीत. तर शहरातील १३ रूग्णांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट नेमका काय येणार याकडे सर्वांचे लक्षण लागले आहे.

दरम्यान, या सर्व बाबींवरून आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की कोरोणा विषाणूमुळे झालेला रोग योग्य औषध उपचारामुळे १००% बरा होतो.
यावेळी प्रांत अधिकारी एरंडोल विनय गोसावी,नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार देवरे,मुख्याधिकारी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, नायब तहसीलदार श्री मोहोड उपस्थित होते. यावेळी अंबुलन्समध्ये बसण्या अगोदर उत्तम व्यवस्थेबाबत रुग्णांनी प्रशासनचे कौतुक केले. तरीसुद्धा सर्वांनी आपल्या घरांमध्ये सुरक्षित राहावे हे आवाहन प्रशासनाने सर्व
धरणगावकरांना केलेले आहे.

खाली पहा : कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3052966854771514

Protected Content