Home आरोग्य रावेरच्या युवकाचा अकस्मात मृत्यू; खबरदारी म्हणून घेतला स्वॅब

रावेरच्या युवकाचा अकस्मात मृत्यू; खबरदारी म्हणून घेतला स्वॅब

0
47

रावेर प्रतिनिधी । रावेर येथील एका ३५ वर्षीय युवकाचा आज दुपारी अकस्मात मृत्यू झाला असून आरोग्य खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविला आहे.

याबाबत वृत्त असे की, एका ३५ वर्षाच्या तरूणाचा दुपारी साडेचारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या तरुणाला उपचारासाठी येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरवर दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच या युवकाचा मृत्यू झालेला असल्याची माहिती कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ एन. डी. महाजन यांनी दिली.

दरम्यान आरोग्य विभागाने खबरदारी घेत संशयित रुग्ण म्हणून या मयत युवकाचा स्वॅग घेतला आहे तर वैद्यकीय प्रक्रिये नुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान तालुक्यातील निंभोरासिम येथील येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या व्यक्तीच्या संपर्कातील ६१ जणांना यापूर्वीच विलगिकरणासाठी कोविड केअर सेंटरवर ठेवण्यात आले आहे.


Protected Content

Play sound