फायझर कंपनीने बनवलेल्या लशीची सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । फायझर कंपनीने बनवलेल्या कोरोना लशीची सर्वत्र चर्चा आहे. फायझर आणि बायोएनटेकने मिळून ही लस विकसित केली आहे.ही लस मायनस ७० डिग्री तापमानात स्टोअर करणे हे भारतासासाठी मोठे आव्हान असेल एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरीया म्हणाले.

कोरोना व्हायरसविरोधात बनवलेली ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा आहे. फेज तीनच्या मानवी चाचण्यांमधून कंपनीने हा निष्कर्ष मांडला आहे. मोठया प्रमाणात परिणामकारक ठरणारी लस उपलब्ध होणार ही चांगली बाब आहे. पण या लशीचे स्टोअरेज करणे हे एक मोठे आव्हान आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी वर्षअखेरीस लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. फायझरने बनवलेली लस खूपच आशादायक चिन्ह आहे असे त्यांनी म्हटले आहे. फायझरने बनवलेली लस नव्या टेक्नोलॉजीने विकसित केली आहे. व्हायरस विरोधात रोगप्रतिकारक शक्तीला सक्रीय करण्यासाठी सिंथेटीक एमआरएनएचा वापर केला जातो.

. मायनस ७० डिग्री सेल्सिअस अंटार्क्टिकात हिवाळ्यात जे तापमान असते, त्या तापमानात लस स्टोअर करावी लागणार आहे.फायझरने लशीचा उपयोग १६ ते ८५ वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.
आमचा उत्साह दुणावला आहे, असे ‘फायझर’च्या नैदानिक विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रुबर यांनी ‘सांगितले.

Protected Content