ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वडनगरीत विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

जळगाव प्रतिनिधी । विकासासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे निधी अर्थात गल्ला असून यात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही. वडनगरी आणि परिसरासाठी आज स्मशानभूमि पोहच रस्ता तयार झाला असून याच्या जोडीला गावातील विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गावाजवळचा पुल आणि रस्त्यासह स्मशानभूमि सुशोभीकरण, व्यायाम शाळेचे प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश दिलेत. परिसरातील वडनगरी ते फुफनगरी; खेडी ते आव्हाणे, वडनगरी ते हिवरेवाट, व दोनगाव ते खेडी  या शेत रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण चे 2 कोटीच्या कामांना आठवडाभरात सुरूवात होणार असून यामुळे परिसरातील शेतकरी ब  ग्रामस्थांची सोय होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील वडनगरी येथे स्मशानभूमी पोहच रस्त्याचे लोकार्पण आणि विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वडनगरी येथे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्मशानभूमी पोहच रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यासोबत गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन सुध्दा करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापतीपती जनाआप्पा कोळी, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, संचालक मुरलीधर पाटील, विभागप्रमुख गजानन सोनवणे, पोलीस पाटील जितू पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते नरेद्रदाजी पाटील, शामकांत जाधव, गाढोदा सरपंच योगेश पाटील, रामचंद्र बापू पाटील, कानालादा सरपंच  पुंडलिक सपकाळे, आव्हाणे सरपंच शीतल पाटील, जयराम पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडनगरीचे सरपंच उमाकांत पाटील यांनी केले. त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील विकासकामे होत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आता स्मशानभूमिच्या पोहच रस्त्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुविधा मिळणार असल्याचे ते म्हणाले. तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अजून काही कामांना गती मिळावी अशी विनंती त्यांनी केली. जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जळगाव तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळाल्याचे नमूद केले. याप्रसंगी कानळदा येथील सरपंच तथा सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलीक सपकाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून वडनगरीसह परिसरातील कामे झपाट्याने सुरू असल्याचे प्रतिपादन केले. आज स्मशानभूमिला पोहच रस्ता मिळाला असून लवकरच स्मशानभूमिचे नवीन बांधकाम आणि सुशोभीकरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबत प्रत्येकी ५० लाख रूपयांची अशी एकूण 2 कोटींची तरतूद असणार्‍या वडनगरी ते फुफनगरी; खेडी ते आव्हाणे, वडनगरी ते हिवरेवाट, दोनगाव ते खेडी हे शेत रस्ते प्रत्येकी ५० लाख मंजूर केले. नवीन बांधकाम मंजुरीचे आश्‍वासन दिले. पेव्हर ब्लॉकचे आश्‍वासन दिले. यासोबत वडनगरी गावात व्यायामशाळा बांधकामाला प्रस्ताव आणि पालकमंत्री शाळा विकासाचा १६ कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत शाळेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूूत्रसंचालन तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. तर आभार ग्रामसेवक सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वडनगरीचे उपसरपंच शशिकांत सोनवणे, कैलास सोनवणे, शाम सोनवणे, अनिल सोनवणे, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, अरूण पाटील, अशोक सोनवणे, मुख्याध्यायपिक आणि उपशिक्षिका चौधरी यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content