जळगावात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या उद्देशाने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतांना शहरात विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या १७ जणांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. संसर्ग कमी व्हावा यासाठी राज्य शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशी शहर पोलीसांनी शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, सुभाष चौक आणि भिलपूरा या परीसरात विनाकारण दुचाकीने बाहेर फिरणाऱ्या कांतीलाल रामचंद्र बारी (वय-६१) रा. रामपेठ, सुनिल रामसिंग अलकारी (वय-५४) रा. कांचननगर, मयुर रविंद्र शिंपी (वय-२५) रा. कांचन नगर, जगदीश रामकृष्ण पाटील (वय-४२) रा. संभाजी नगर, शंशीकांत शंकरराव कोकाटे रा.जळगाव, प्रफुल्ल श्रीकांत भोरटक्के (वय-३८) रा. जयकिसनवाडी, जळगाव, प्रदीप मधुकर वाघ (वय-३८) रा. राधाकृष्ण नगर, अरीफ जाहीद देशमुख (वय-५२) रा. शनीपेठ, सिद्दकी कादरी मनियार (वय-३२) रा. शाहु नगर, अरबाज गफ्फार मनियार (वय-३२) रा. फातिमा नगर, शुभम राजेंद्र सोनवणे (वय-२२) रा. विशाल कॉलनी, किरण सुभाष कोळी (वय-२७) रा. वाल्मिक नगर, संजय प्रभाकर चौधरी (वय-४४) रा. रामनगर जळगाव, सम्राट सुरेश सोनवणे (वय-२४) रा. सुरेशदादा जैन, सोपान सुभाष शिरसाट (वय-२८) रा. देवगाव ता.जि. जळगाव आणि रोहित संजय साळुंखे (वय-१९) रा. शाहुनगर या १७ जणांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यात १६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content