शिवसेना महानगरच्या वतीने दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी महापालिकाजवळील शिवसेना कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवसेना महानगरच्या वतीने दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण सोहळा आणि शिवसेना सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला.

आज बुधवार, दि. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयकिसनवाडीतील शिवसेना कार्यालयासमोर शिवसेना सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात स्वत: महापौर जयश्री महाजन यांनी अनेकांचे सदस्य नोंदणीचे फार्म भरले.

या कार्यक्रमानंतर जळगाव शिवसेना महानगरच्या वतीने दोन रूग्णवाहिकेचे मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, सुनील महाजन, नितीन लढ्ढा  यांच्यासह शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content