चाळीसगावला विठ्ठल रुख्मिणी मंदिरात “आषाढी एकादशी’निमित्त कार्यक्रम

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पवारवाडी येथील श्री‌ विठ्ठल रुख्मिणी मंदिरात “आषाढी एकादशी’निमित्त आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शहरातील पवारवाडी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास “आषाढी एकादशी’ निमित्त श्री. विठ्ठल रुख्मिणी वर अभिषेक करण्यात आला. तद्दनंतर भाविकांना उपवासाचा संस्थेच्या वतीने साबुदाणा खिचडी व केळींचे भाविकांना दिवसभर वाटप करण्यात येणार आहेत. सकाळ पासून सायंकाळपर्यंत भंजनी मंडळाच्या वतीने भक्तीपर भंजन सादर करण्यात आले.

काल रात्री पवारवाडी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठल रुख्मिणी मंदिर रोषणाईने उजळून निघाले होते . आषाढी एकादशीच्या पुर्वसंधेला विठु माऊली तु भक्ती गीताचा सुरेल संगम कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक नंदकुमार देशपांडे आणि सहकारीवृंद च्या वतीने सादर करण्यात आला. सकाळी विघ्नहर्ता महिला भंजनी मंडळ यांचा तर दुपारी गोविंद पवार यांच्या भंजनी मंडळाचा भक्तीमय भजन गायनाने वातावरण भक्तीमय झाले होते. आज रोजी विठ्ठल रुक्मिणी संस्थान च्या वतीने पवारवाडी परीसरात विठ्ठल रुख्मिणींच्या पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीरसात संपन्न झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिकन पवार, सतीश पवार, अनिल पवार, बाळासाहेब पवार, गणेश पवार, सुनील पवार, बबन पवार, अनिल पवार, किरण पवार, चेतन पवार, सागर यादव, अमोल पवार, रवींद्र पाटील, स्वप्नील गायकवाड, धनराज महाजन, विनोद पवार, मंगेश देठे, योगेश गव्हाणे, योगेश अजबे, शरद पवार, निखिल पवार, राकेश पाटील, अक्षय काळे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी संस्थान व जय भवानी मित्र मंडळाच्या सदस्यानी परीश्रम घेतले.

Protected Content