खेडी रोड परिसरात मोकळ्या जागेतील गवताला लागली आग; दोन बंब घटनास्थळी दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील महालक्ष्मी पार्क येथील मोकळ्या जागेत असलेल्या कोरड्या गवताला सोमवारी ६ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरातील गवत जळून खाक झाले आहे. यात इतर कोणतेही नुकसान झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होवून ही आग विझविण्यात आली.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील महालक्ष्मी पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात असलेल्या कोरड्या गवताला सोमवार ६ मे रोजी दुपारी २ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे संपुर्ण परिसरात ही आग पसरली. या परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी तात्काळ जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही मिनीटात ही आग विझविण्यात आले. दरम्यान, या परिसरात आजूबाजूला काही घरे देखील आहे. सुदैवाने कोणत्याही घराला आग लागली नाही. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेले नाही.

Protected Content