पाचोऱ्यात “जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा” शानदार समारोप

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे मानसिंगका मीलच्या प्रांगणात सुमित किशोर पाटील प्रस्तुत जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा “जल्लोष – २०२२” या गरबा दांडिया रासचा शानदार समारोप झाला. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी समारोप सोहळ्यास हजेरी लावल्याने प्रेक्षकांनी अक्षरशः जल्लोष केला.

आमदार किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिता पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, पिपल्स बँकेच्या संचालिका मयुरी मुकुंद बिल्दीकर, एम. एस. पी. बिल्डकॉनचे मनोज पाटील, वर्षा पाटील, साई पाटील ,सुमित पाटील, आदित्य बिल्दीकर, डॉ. प्रियंका पाटील, अनुष्का बिल्दीकर, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, भाजपा व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन, माजी जि. प. सदस्य पद्मसिंग पाटील, आनंद पगारे, श्रद्धा केसवानी, रवी केसवानी, संजय गोहिल, नगरसेवक वाल्मीक पाटील, सतीश चेडे, किशोर बारवकर, प्रवीण ब्राम्हणे, राजेश पाटील, सुमित सावंत, जितेंद्र पेंढारकर, मंदा पाटील, उर्मिला शेळके, शरद पाटे, मुन्ना गौड, अरुण ओझा, एकनाथ पाटील, समाधान पाटील, लखन मराठे, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन, डॉ. कादंबरी महाजन, सुभाष अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, ग्रीन अॅपल इव्हेंट्सचे संदीप महाजन, भूषण पेंढारकर, राहुल पाटील, जितेंद्र काळे, गुड्डू शेख, धनराज पाटील, अतुल चित्ते, मनोज बडगुजर आदि उपस्थित होते.

बालगट, मोठा गट व खुला गट यांच्या स्वतंत्र गरबा दांडियाचे राऊंड घेण्यात आले. या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद लाभला. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे मॅचिंग पेहराव केलेल्या महिलांच्या नावाचे ड्रॉ काढण्यात येऊन त्यांना पैठणी देण्यात आली. तर आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. सय्यद सलमान, विद्या गायकवाड, किशोर भावसार, कामिनी सैंदाणे, भावेश चौधरी, चैतन्य सोनवणे, सोनाली येवले, दिलीप कुमावत, कृषी विभाग सुनिता पाटील तेजल कापुरे, सपना अहिरे हे पैठणी व बक्षिसांचे मानकरी ठरले.

परिक्षक म्हणून प्रिती बोथरा, शितल महाजन, उर्वशी मोर, दूष्यंत खंडेलवाल, मालवीन सालोमन यांनी अचुक कामगिरी पार पाडली. प्रार्थना बेहरे यांनी दांडिया व गरबा खेळून केलेले नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावल्याने प्रेक्षक व स्पर्धकांनी साद व दाद देत खऱ्या अर्थाने जल्लोष केला. आमदार किशोर पाटील यांच्या कन्या डाॅ. प्रियंका पाटील, मयुरी बिल्दीकर, अनुष्का बिल्दीकर, शितल महाजन, प्रीती बोथरा, प्रा. डॉ. वैष्णवी महाजन, डाॅ. कादंबरी महाजन यांचे सोबत प्रार्थना बेहरे यांचे सोबत दांडिया खेळुन उत्साह वाढविला. प्रेक्षकांनी टाळ्या, शिटयांनी साद व दाद दिली. याप्रसंगी परिक्षक प्रीती शितल महाजन, उर्वशी मोर, भूषण खंडेलवाल, मालवी सालोमन, निवेदक प्रकाश रोडगे, अमोल पाटील, सचिन जैन, संतोष यांचेसह ग्रीन अॅपल ईव्हेंट्सच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार बक्षीस वितरण झाले. प्रथम “जल्लोष – २०२२” मध्ये सहभागी ७०० खेळाडूंना बक्षीसे देण्यात आली. त्यानंतर बेस्ट ऍक्शन, बेस्ट ड्रेस, बेस्ट जम्पिंग विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आले. दांडिया किंगचा बहुमान पाचोरा येथील यश पुर्सनानी व दांडीया क्विनचा बहूमान ऋतुजा नितीन पाटील यांनी पटकावला. त्यांना प्रथम पुरस्कार म्हणून एक्टिवा (5 – जी) मोपेड देण्यात आली. विजेत्यांना आमदार किशोर पाटील, नर्मदा पाटील, मुकुंद बिल्दीकर, सुमित पाटील, आदित्य बिल्दीकर, डॉ. प्रियंका पाटील, सुनिता पाटील, मयुरी बिल्दीकर, एम. एस. पी. बिल्डकॉनचे संचालक मनोज पाटील, वर्षा पाटील, श्रद्धा केशवानी, रवी केसवानी, कांतीलाल जैन, मनोज पाटील, साई पाटील, अनुष्का बिल्दीकर, समाधान पाटील यांचे हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

तसेच आगामी वर्षात जल्लोष – २०२३ साठी दांडिया किंग व क्वीन यांना चार चाकी गाडी भेट देण्याचे मुकुंद बिल्दीकर यांनी जाहीर केले. त्यावेळी उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांनी आमदार किशोर पाटील, सुमित पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मूकूंद बिल्दीकर, एम. एस. पी. बिल्डकॉनचे संचालक मनोज पाटील व ग्रीन ॲपल इव्हेंट्सचा जयघोष करत घोषणाबाजी केली. याप्रसंगी मुकुंद बिल्दीकर, आमदार किशोर पाटील, प्रार्थना बेहेरे यांनी मनोगत व्यक्त केले. ऑर्केस्ट्रा पथकाने सुर व संगीताची तसेच उजाला डिजिटल साऊंडने आवाजाची खऱ्या अर्थाने उधळण केल्याने उपस्थित सर्वांनीच ठेका घेऊन प्रतिसाद दिला.

भुसावळ येथील सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश भैय्या यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत शेरोशायरी करत स्पर्धेचे धावते वर्णन केले. मुकुंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एन. चौधरी यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. आयोजक सुमित किशोर पाटील यांनी गरबा दांडिया रासचे स्पर्धक व उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले.

 

Protected Content