जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लहान मुलीला बोलल्याच्या कारणावरुन रस्त्याने जात असतांना महिलेसह मुलगा आणि पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी पिंप्राळा हुडको भागात घडली. यावेळी महिलेचा मुलासह पतीवर देखील धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील गौतम नगरात अलका भिमराव अहिरे या महिला वास्तव्यास आहे. त्या विश्वास चंडाले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला असून त्या मुलगा सागर, दिनेश यांच्यासोबत राहतात. १६ मार्च रोजी त्यांच्या गल्लीत राहणारी मुलगी मंदिरात आली होती, यावेळी अलका अहिरे या त्या मुलीला तुम्ही मटन खातात मंदिरात का येतात असे बोलल्या होत्या. त्याच्या कारणावरुन त्या मुलीची आईचे आणि अलका अहिरे यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. रविवार १७ मार्च रोजी अलका अहिरे या महिलेच्या घराशेजारुन जात असतांना पन्ना हा महिलेच्या पाहून शिवीगाळ करीत होता. तसेच त्याने घरात जावून धारदार शस्त्र आणले आणि त्या शस्त्राने त्याने महिलेच्या डोक्यावर आणि पोटावर मारुन गंभीर जखमी केले.
महिलेवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर महिला जखमी अवस्थेत असतांना त्यांचा मुलगा सागर हा त्याठिकाणी आला. त्याला देखील पन्ना याने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, महिलेच्या पती विश्वास चंडाले यांच्यावर देखील वार केले असून त्यांच्यावर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.