अपघातात महिला वनरक्षकाचा पतीसह मृत्यू

mamta patil mayat रावेर प्रतिनिधी । सहस्रलिंग जवळ झालेल्या अपघातात प्रादेशिक वनीकरणाच्या वनरक्षक ममता पाटील व त्यांचे पती हेमंत पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर प्रादेशिक वनीकरणाच्या वनरक्षक ममता पाटील या आज दुपारी आपल्या पती सह मोटरसायकलने पाल कडे जात असतांना सहस्रलिंग नजिक त्यांना महेंद्र पिकअप या वाहनाने जोरदार धडक दिली. यात ममता पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती हेमंत पाटील यांना जळगाव येथे उपचारार्थ नेत असतांना त्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनपाल अतुल पाटील श्री भदाणे, वनरक्षक हरीश थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी पाठवीले. ममता पाटील यांचा मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. धडक देणार्‍या महेंद्र पिकअपचा चालक फरार झाला आहे. मयत वनरक्षक ममता पाटील या पाल येथे नोकरीला होत्या.

Protected Content