पाचोरा येथे खाजगी वाहनातून साडेपाच लाखाची रोकड जप्त

cash

 

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकांची घोषणा केली असून निवडणूकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तसेच या कालावधीत बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात भरारी व स्थिर सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती केली आहे. पाचोरा येथे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने आज खाजगी वाहनातून पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जमा केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा श्री. राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर केला असून 10 मार्च, 2019 पासून जिल्ह्यात निवडणूकआचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार 18-पाचोरा विधानसभा मतदान संघात आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी श्री. किशोर महाले यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या तपासणींतर्गत वाहनांची तपासणी करतांना वाहन क्रमांक एमएच 19 एपी 4403 वॅगनर या प्रकाराच्या वाहनातून रुपये 5 लाख 45 हजार जप्त केले आहेत. ही रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांच्याकडे तात्काळ जमा करण्यात आली असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Add Comment

Protected Content