पाचोऱ्यात व्यापारी असोसिएशनतर्फे शेतकऱ्यांसाठी दहा रुपयात जेवणाचा अभिनव उपक्रम

 

पाचोरा, प्रतिनिधी  ।  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या अनोख्या उपक्रमाने शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळणार आहे. याउपक्रमाचे उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीमध्ये आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणलेल्या शेतकऱ्याला उपाशी राहुन आपला शेतीमालाचा लिलाव होईपर्यंत  ताटकळत बसावे लागते. अश्या परिस्थितीत व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण  देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी  पाचोरा बाजार समिती ही  जिल्ह्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. या उपक्रमाबद्दल येथील व्यापारी बांधवांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या उपक्रमाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करून खरेदी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश अग्रवाल, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत ते पार पडले. यावेळी भरत शेंडे, सुभाष अग्रवाल, अतुल सावा, बाजार समिती सचिव बी. बी. बोरुडे, सुखदेव पाटील, निखिल बडोला, चेतन गौड, भुषण बोथरा, प्रतिक मोर, मनोज सिसोदिया, योगेश संघवी, प्रकाशशेठ बांठीया, गोविंद देवरे, लिलाव सुपरवायझर आर. बी. पाटील व बाजार समिती कर्मचारी वृंद व हमाल मापाडी बांधव उपस्थित होते.

 

Protected Content