अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी — राहुल गांधी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे कोरोनाची दुसरी लाट आहे स्थलांतरित मजूर पुन्हा गावाकडे परतण्यासाठी मजबूर आहेत. समान्यांचं जीवन व अर्थव्यवस्थेसाठी लसीकरण वाढवने व  त्यांना  पैसा देणं आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी  आहे.” असं राहुल गांधी यांनी  म्हटलं आहे.

 

देशात संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे रूग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत देखील लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे येत आहे. त्यामुळे नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. भारताकडून अन्य देशांना लस निर्यात होत असताना, महाराष्ट्रासह काही राज्य लसींचा पुरवठा वाढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात.” अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केलेली आहे.

 

“वाढत्या संकटात लसींची कमतरता एक गंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधी म्हणाले होते.

 

संसर्गामध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Protected Content