भुसावळ उपनगराध्यक्षपदी सैय्यदाबी शेख यांची निवड

 

 

 

 

5f39c979 b832 4832 93ce f29deef9d56a

भुसावळ (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका सैय्यदाबी शेख शफी यांची निवड करण्यात आली आहे.
नगरपरिषदेवर सध्या भाजपाची सत्ता आहे. ठरल्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाची एक वर्षासाठी उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे.

उपनगराध्यक्ष लक्ष्मी रमेश मकासरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे दिला होता. आज सकाळी ११.०० वाजता उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नगरसेविका सैय्यदाबी शेख शफी यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नगरसेवकाने अर्ज दाखल केला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र पवार यांनी अर्जाची पडताळणी केली, त्यात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह बाब नसल्याने व दुसरा अर्जही नसल्याने दुपारी १२.०० वाजता सैय्यदाबी शेख शफी यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेते हाजी मुन्ना तेली आदी उपस्थित होते. निवडीनंतर भाजपचे नगरसेवक, विरोधी पक्ष जनआधारचे गटनेता उल्हास पगारे व अन्य नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content