छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी राज्यातील वेगवेगळया शहरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध जिल्हयातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. बीड येथील २२ पोलिस ठाण्यात ४२५ जणांवर विनापरवानगी आंदोलन केल्याने गुन्हे नोंदवले गेलेले आहे.
हिंगोलीत ३७० जणांवर ६ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. धाराशिव जिल्हयांत १०० हूण अधिक जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जालना जिल्हयात ८९ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे तर संभाजीनगर जिल्हयात १५० जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे, तर नांदेडमध्ये २९ जणांवर गुन्हा दाखल केला गेलेला आहे. या आंदोलकांना ताकीद देऊन सोडले आहे. मराठवाड्यात एकूण १०४१ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले.