Home Cities पारोळा उद्योजक अमृत चौधरी शिवसेनेत : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

उद्योजक अमृत चौधरी शिवसेनेत : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

0
55


मुंबई-विकास चौधरी | येथील ख्यातनाम उद्योजक अमृत चौधरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्यांची पारोळा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तसेच आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या पुढाकाराने प्रवेश सोहळा पार पडला. यात उद्योजक अमृत चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांची लागलीच पारोळा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

याच कार्यक्रमात माजी शिवसेना शहरप्रमुख अण्णा नारायण चौधरी यांची शिवसेनेत घरवापसी झाली. त्यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश घेणार्‍यांचे प्रमाण वाढले असून आज अमृत चौधरी यांच्या आगमनाने पक्षाला पुन्हा एक नवा खंदा शिलेदार मिळाल्याचे मानले जात आहे.


Protected Content

Play sound