मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे 2 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ निर्णयाला घटनात्मक वैधता असून राज्यात हे काय सुरु आहे. असा सवाल संजय राऊत यांनी राज्यपालांना केला आहे.
संजय आवटे यांनी समाज माध्यमावर एक ट्वीट करत “भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नसून गेले 2 आठवडे राज्यात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरू आहे ?” सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शपथविधीला दोन आठवडे उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. आता संजय राऊत यांनी भारतीय घटनेचा हवाला देत मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय वैध नसल्याचे म्हटले राऊत यांनी ट्विट करत आपलं मांडलं आहे.