भाजप नेत्यांचा सोशल मीडियावर ”मोदी का परिवार” लिहत अनोखा प्रचार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कुटुंबावरून वैयक्तिक टिप्पणी केली. तेलंगणेतील एका सभेत मोदींनी देशातील १४० कोटी जनता माझा कुटुंब आहे, असे त्या विधानाला प्रत्युत्तर दिला. त्यामुळे भाजपचे सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया ॲप (एक्स) आपल्या नावापुढे ‘मोदी का परिवार’ असे लिहत ही मोहिम राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लालूंच्या त्या भाषणाला भाजपने शस्त्र बनवले आणि राजकीय डाव खेळला.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी आणि ते मोदी परिवाराचा हिस्सा आहे हे दाखविण्यासाठी सोशल मीडीया ॲप ‘एक्स’ वर ‘मोदी का परिवार’ असा बदल बायो मध्ये केला आहे. यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, अमित शाह, जेपी नड्डा, पियुष गोयल यांच्यासह राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर आदींनी त्यांचे बायो बदलले आहे. शनिवारी लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या कुटुंबाबाबत वैयक्तिक टिका – टिप्पणी केली होती. आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण देश त्यांचे कुटुंब आहे. त्यानंतर आज भाजपच्या नेत्यांनी त्यांचे मिडिया हँडल ‘एक्स’ वर त्यांच्या नावासमोर मोदी का परिवार हे वाक्य जोडत लालुप्रसाद यादव यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

Protected Content