पक्ष मजबूतीसाठी लवकरच उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पक्षाला मजबूत करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून लवकरच ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

पक्षाला मजबूत करण्याच्या उद्देश्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गावागावात ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. या माध्यमातून ते शिंदे गटाला आव्हान देणार आहेत.

उद्धव ठाकरे हे सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून येत्या त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी आणि आखणी सध्या शिवसेना भवनात सुरु झाली आहे. काही दिवसात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दौऱ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना उभारी मिळेल का ? कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा असेल हे येत्या काळात कळेल.

     

Protected Content