राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला उडविले; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातप्रकरणी सोमवार रोजी  धरणगाव पोलीसात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे सुभाष अरूण कापूरे वय-५१ हे आपल्या पत्नी वैशाली सुभाष कापूरे यांच्यासोबत वास्तव्याला होते. २० नोव्हेंबर रोजी दाम्पत्य के दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके ७७५८) ने यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे गेले होते. काम आटोपून दाम्पत्य हे डोंगरकठोरा येथून फरकांडे येथे जाण्यासाठी निघाले. रात्री १० वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने जात असतांना पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुभाष कापूरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांची पत्नी वैशाली कापूरे या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर वैशाली कापूरे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content