अ.भा. गुजर देव सेनेचे आगार येथे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात

यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय गुजर देव सेनेच्या एकविसाव्या स्थापना दिवस मध्यप्रदेशातील नलखेडा जिल्हा आगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर गुजरात राजस्थान मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्यासह देशभरातील गुजरात देव सेना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय गुजर देव सेना ही राज्यांमध्ये पोहोचली असून देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष  धन्नालाल जी तेवढा यांनी  यावेळी स्पष्ट केले नजीकच्या कालखंडात देशातील सर्व राज्यांमध्ये पोहोचण्याचा निर्धार यावेळी सर्वांनीच व्यक्त केला अखिल भारतीय गुजर देवसेना 10 जानेवारी 2000 रोजी स्थापन झाली आज 21 वर्षाच्या कालखंडात देशात या संघटनेने विविध स्तरावर संघटन उभे करून समाज संघटित करण्याचे काम जोरात सुरू केले आहे भारतातील गुजर समाज हा एका झेंड्याखाली एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून भगवान देवनारायण यांच्या नावाने ही संघटना स्थापन झाली सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने तिचा व्याप वाढत असून संघटन असले म्हणजे शक्ती मोठी असते तेवढी सर्वच वक्त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान येथील प्रदेश अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांचा गुजर देव सेना मध्यप्रदेश शाखेतर्फे सत्कार करण्यात आला त्यात महाराष्ट्र प्रदेश शिवसेना अध्यक्ष डिके पाटील सचिव अरुण पाटील व सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासुदेव पाटील पत्रकार वडाळी तालुका शहादा यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला समाजात मुलींना शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि मुलांप्रमाणेच मुलीला वागणूक द्यावी लग्न समारंभामध्ये वायफळ खर्च केले जातात त्यावर कात्री लावावी आणि समाजात देहेड निर्माणकर्ता एकोपा कसा निर्माण होईल यावर सर्वच वक्त्यांनी भर दिला नजीकच्या कालखंडात यावल तालुक्यात अखिल भारतीय गुजर देव सेनेचा मेळावा घेण्याचे ठरले असून लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रदेश अध्यक्ष दिघे पाटील यांनी जाहीर केले व या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना आमंत्रित ही केले. नलखेडा जिल्हा आगर मध्यप्रदेश येथील बंगला मुखी देवी प्रांगणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देशभरातून दीड ते दोन हजाराच्या वर प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Protected Content