यावल तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी; गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली येथे रशिद अजीज पटले (वय-४२) रा. विरारनगर यावल हा दुचाकी (एमएच १९ सीपी ५८६८) ने १० डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आले. त्यावेळी हॉटेलसमोर दुचाकील पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने पार्कींगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघड झाली. परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू न मिळाल्याने शनिवार ११ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, यावल तालुक्यातील साकळी शिवारातील मनवेल रोडवर शेख हकीम अब्दुल हकीम (वय-३९) रा. साकळी ता. यावल जि.जळगाव हे (एमएच १९ बीआर ८८७९) दुचाकीने शनिवार ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान शेतात गेले. शेताच्या बांध्यावर त्यांनी दुचाकी उभी करून लावली व शेतात कामावर निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शेख हकीम यांनी यावल पोलीसात दुचाकी चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळ करीत आहे.

Protected Content