जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात दोन कुटुंबांमध्ये वाद घालत गोंधळ केला. यात दोन्ही परिवारामध्ये झोंबाझोंबी केल्याच्या कारणावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन कुटुंबिय किरकोळ वाद घेवून शुकवार १० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता आले होते. यावेळी दोन्ही कुटुंबियांमध्ये पोलीस ठाण्याच्या आवारातच वाद सुरू करून गोंधळ घातला. अरबाज खान शकील खान (वय-२१), साजीदाबी सत्तार बिस्ती (वय-४०) दोन्ही रा. शाहू नगर जळगाव, तुळशीराम पितांबर जाधव (वय-७२), अनुसयाबाई तुळशीराम जाधव (वय-६५) दोन्ही रा. पिंपळकोठा भोलाण ता. पारोळा ह.मु. बिबा नगर जळगाव यांच्यात वाद झाल्यानंतर गोंधळ केला. यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून हा वाद मिटविला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील शांतता भंग व गोंधळ घातल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबर विकास पहूरकर यांच्या फिर्यादीवरून शनिवारी ११ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता चौघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहे.

Protected Content