भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स परिसरात राहणारी २४ वर्षीय हर्षदा दिलीप महाजन ही तरुणी गुरुवार, २६ जून रोजी रात्री नऊ वाजेपासून कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. या संदर्भात आज शनिवारी, २८ जून रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा महाजन आपल्या कुटुंबीयांसह गोलाणी कॉम्प्लेक्स येथे वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता ती घरातून अचानक निघून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, कुटुंबीयांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ बेपत्ता झाल्याची नोंद करून घेतली आहे. पोलीस नाईक राज किरण झाल्टे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हर्षदा महाजनबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.