शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीतर्फे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी

 

एरंडोल, प्रतिनिधी । येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे 151वी महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती कोवीड -१९ काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून उत्साहात साजरी करण्यात आली.

बी. फार्मसी चे उपप्राचार्य प्रा. गोपीचंद भोई यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व तसेच डी. फार्मसीचे उपप्राचार्य प्रा. जावेद शेख यांनी दिप प्रज्वलन केले. 151वी महात्मा गांधी जयंती निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले व कार्यालयीन व्यवस्थापक अजय शिंदे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पलासदल येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आला, सदरील कार्यक्रमास पलासदल, जळू ग्रुप-ग्रामपंचायत चे सरपंच रवी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. गोपीचंद भोई यांनी कोरोना काळातील स्वच्छतेचे महत्व व कोरोना काळात घ्यावयाची काळजी या विषयी उपस्थित ग्रामस्थांना माहिती सांगितली. या कार्यक्रमास ग्रंथपाल सरिता भोई-जावरे, प्रा. हितेश कापडणे, विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील, प्रा. राहुल बोरसे, व संस्थेचे समस्त कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content