गुरु जगन्नाथ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा

फैजपूर-ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सतपंथ मंदिर संस्थानचे अकरावे गादीपती ब्रम्हलीन  गुरु जगन्नाथ महाराज यांचे कार्य अलौकिक होते. सतपंथासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून कार्य सुरू ठेवले. त्यांचा कृपाप्रसाद म्हणून गुरूंचे स्वप्न साकार करणारे  महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांच्यारूपाने अनमोल रत्न मिळाले आहे. त्याचे फळ नक्कीच आपल्यालाही काही अंशी प्राप्त होईल असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री स्वामी मनमोहन दासजी उर्फ राधे राधे बाबा यांनी सांगितले.

येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गुरु जगन्नाथ महाराज यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी धर्मपीठावर अखिल भारतीय संत समिती महामंत्री राधे राधे बाबा, अ भा सं. स महाराष्ट्र अध्यक्ष प. पू. गोपाल चैतन्य जी बाबा, म. प्र. प्रदेश महामंत्री  तथा प्रवक्ता हनुमान दासजी महाराज, स्वामी अखिलानंदजी महाराज, अवघेश शास्त्री महाराज, हभप रवींद्र महाराज हरणे, शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज, प. पू. श्याम चैतन्य जी महाराज, स्वरूपानंदजी महाराज, आचार्य पवनकुमारदासजी महाराज, कन्हैयाजी महाराज, आचार्य श्रीकांत रत्नपारखी, डॉ. आचार्य सचिन जी, हभप रवींद्र महाराज  महाले, स्वामी बलराम दासजी, हरीश चैतन्य जी महाराज, प. पू. शकुंतला दीदी, मीरा दीदी, हभप नितीन महाराज, हभप गणेश महाराज यांचेसह अमेरिकेहून आलेले विठ्ठल भाई पटेल, सरोजबहन, वर्षा बहन, डॉ. कुंदन फेगडे, पांडूरंगशेठ सराफ, जफर भाई बाबू शेठ, मुखी गण, हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

ब्रम्हलीन जगन्नाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या चार दिवसापासून महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांच्या वाणीतून भगवान दत्तात्रयाची २४ गुरु बद्दल अमृत वाणी सत्संग, आज सकाळी भव्य शोभायात्रा, रक्तदान शिबीर, अन्नदान आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या दानशूर परिवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्ताई संस्थांचे हभप रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले की, सर्व पंथांना एकत्रित आणून धर्माचा प्रचार करणारे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी तन, मन, सेवा गुरूंच्या चरणी अर्पण केल्याचे फळ आपणा सर्वांना मिळत आहे. हे आपल्या भागाचे सौभाग्य आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नायगव्हाण येथील श्री सद्गुरू गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था या गुरुकुल मधील आलेले दोनशे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे तेवढे कमी असून त्या संस्थेचे कार्य करणारे ह भ प रवींद्र महाराज महाले यांचे सर्व संत मंडळींनी विशेष अभिनंदन व कौतुक केले.

सरपंच चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे या संस्थेला एक लाख रुपयाची भरीव मदत उपस्थित संतांच्या हस्ते देण्यात आली. आचार्य डॉक्टर सचिन पाटील यांनी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित  तुलसी हेल्थ केअर सेंटर विषयी माहिती देताना सांगितले की, तुलसी हेल्थ केअर सेंटर आरोग्य तीर्थ म्हणून नावात रूपाला येत आहे. आपल्या अनमोल आरोग्यासाठी प्रत्येकाने या आरोग्य तीर्थाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांनी श्री सतपंथ मंदिर संस्थान तथा सथपंथ चरिटेबल ट्रस्ट मार्फत राबविले जाणारे सर्व सेवाभावी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मी भव्यदिव्य कार्य करू शकतो ते माझ्या  विश्वासू कार्यकर्त्यांमुळेच.  शैलेश सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Protected Content