जे. टी. महाजन स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा

j.t. english school

फैजपूर प्रतिनिधी । येथील जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये नुकतेच श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तसेच इ .८ वीच्या विद्यार्थिनींनी कृष्ण जन्मावर आधारित गीत सादर करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृष्ण, कंस अशी वेशभूषा धारण करत कंसवध नाट्यप्रसंग सादर केले. यानंतर दुष्ट कंसाचा वध झाल्याने दृष्ट प्रवृत्तीही नष्ट झाल्या व जनता सुखी झाली. म्हणून जसे गोप-गोपिकांनी रासलीला केली. त्याचप्रमाणे विद्यार्थीनींनी ही गोपिकांचे रूप धारण करून ‘आज राधा को श्याम याद आ गया’ या गाण्यावर ठेका धरत कृष्ण महारासलीला सादर केली. आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण कृष्णमय झाले. कृष्ण जन्मानंतर दहीहंडी हा गोपालांचा मनमोहक खेळ व श्री कृष्णाच्या रासक्रीडेचा एक भाग असून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवत विद्यार्थ्यांनी गोपस्तंभ उभा करून दहीहंडी फोडली. ‛हाथी घोडा पालखी; जय कन्हैया लाल की’ च्या गजरात दहीहंडीचा आनंद लुटला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी जन्माष्टमी पूजन करून पाळणा झुलवला व कृष्ण जन्मामुळे हर्षित झालेले जे.टी.महाजन स्कूलचे वातावरण भक्तिमय झाले होते.

कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या उपशिक्षिका सुनिता चौधरी यांनी श्रीकृष्ण जन्माची कथा सांगत, यासोबतच कंसवधाचा हेतू व पृथ्वीवरील पापांचा अंत, ईश्वराचे या कृष्णरूप अवताराचे गमक याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती मुलांना दिली. कलाशिक्षिका वैशाली किरांगे यांनी आपल्या फलकचित्रातून कृष्णलीला व कृष्ण दहीहंडीचा देखावा चित्रित केला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पूनम नेहेते विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका तृप्ती सोनवणे यांनी तर यामिनी लोखंडे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

Protected Content