माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

arun3

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. दरम्यान, किडनी ट्रान्सप्लांटनंतर अरुण जेटली यांचा आजार बळावला होता. 2019 च्या निवडणुकीत तर ते बाहेरही पडू शकले नाहीत. निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली होती.

Protected Content