फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी म्हणुन कैलास कडलग

यावल, प्रतिनिधी । येथील फैजपुर विभागाचे कोरोना विषाणु महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी वर्ग३या या पदावर बदली झाली असून त्यांच्या जागी तळोदा येथुन फैजपुर येथे बदली झालेले कैलास गडलग हे विभागाचे प्रांत अधिकारी म्हणुन पदभार सांभाळणार आहेत.

प्रांत अधिकारी कैलास कडलग सोमवारपर्यंत फैजपूर येथे आपले पदभार सांभाळणार असल्याचे वृत्त आहे. कैलास कडलग यांनी २०१३ ते १४या कालावधीत यावलचे तहसीलदार म्हणुन कार्य केले आहे. तर कोरोनाच्या महामारीत लक्षवेधी कामगिरी बजावणारे यावलचे शिस्तप्रिय तहसीलदार जितेन्द्र कुवर यांची देखील जळगाव येथे संजय गांधी निराधार विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगरहुन महेश पवार हे यावलच्या तहसीलदार पदाची सुत्रे सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.

Protected Content