२० ऑक्टोबरपासून सुरु होणार निवडक रेल्वे गाड्या

मुंबई– अनलाॅक ५ अंतर्गत प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेने २० ऑक्टोबरपासून निवडक रेल्वे गाड्या सुरू करण्याचे नियाेजन केले आहे.

जनशताब्दी, तपाेवन, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंटर सिटी, मुंबई-पुणे (सिंहगड), प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस), मुंबई-गाेंदिया (विदर्भ एक्स्प्रेस), मुंबई-लातूर, मुंबई-साेलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस), मुंबई-काेल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस), पुणे-साेलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस), पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-नागपूर (गरीबरथ एक्स्प्रेस), पुणे-भुसावळ, काेल्हापूर-गाेंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस), पुणे येेथून धावणाऱ्या झेलम आणि दरभंगा एक्स्प्रेसही सुरू होणार असून मुंबईहून पंजाब, मंगलोर आणि कराईकल एक्स्प्रेसही २० ऑक्टोबरपासून सुरू होतील. यासाठी १५ ऑक्टोबरपासून अारक्षण सेवा सुरू हाेणार आहे.

पहिल्या टप्प्यात महत्वाच्या गाड्या सुरु करण्यात येत असून लवकरच अन्य ट्रेन्स सुद्धा सुरु होतील असे संकेत मिळाले आहेत.

Protected Content