विद्यार्थ्यांच्या परिक्षा सत्राचे शैक्षणिक शुल्कात कपात करावी: भाजप युवा मोर्चाची मागणी

यावल प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या संकटात गेल्या पाच महिन्यांच्या राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या परिक्षा सत्राचे शैक्षणिक शुक्ल कपात करावी या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवुन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात कोराना महामारीमुळे अंतीम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या पारिक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परन्तु विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परिक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांकडुन घेण्यात आलेली परिक्षा शुल्क परत करण्यात यावी व शैक्षणिक वर्ष२०२० ते २०२१या वर्षाच्या शैक्षणीक शुल्कात ३० टक्के कपाप करण्यात यावी, त्याचबरोबर सरासरीच्या सुत्रामुळे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या निकालाचे पुनर्मूल्यांकन करावेत, नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडुन एकुण शैक्षणीक शुल्कात जास्तीत जास्त १५ टक्के प्रवेश शुल्क घेवुन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्कचार टप्प्यात घेण्यात यावे तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांची गाडी आडवणाऱ्या विद्यार्थांवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुषपणे लाठीमार व बुक्यांचा मारहाण करण्यात आले, या घटनेचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या या हल्ल्यांना अलीशान मोटारीत बसुन बघ्याची भुमिका घेणाऱ्या पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली असुन, निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना देण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, स्नेहल फिरके, शेखर बावीस्कर, संजय फेगडे, अमोल चौधरी, मयुर पाटील, रिपाईचे विष्णु पारधे , सुजित वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content