देवगाव देवळी येथे हिंदी दिनानिमित्त वकृत्व व निबंध स्पर्धा

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे आज (दि.14 सप्टेंबर) हिंदी दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याध्यापक अनिल महाजन, जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शिक्षक एच.ओ. माळी होते. सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीतील 40 विद्यार्थ्यांनीं निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला. हिंदी दिनाचे औचित्य साधून आठवी ते दहावीतील 10 विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनीं कविता गायन केल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले. शाळेत वकृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम इयत्ता 10 वी तील विद्यार्थ्यांनी यशस्वी पाटील,नववीतील द्वितीय विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील ,तृतीय इयत्ता दहावीतील शिवम  पाटील उत्तेजनार्थ आठवीतील विद्यार्थिनी त्यांनी यश प्राप्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!