कोरपावलीत महाराष्ट्र शासनाच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाव्दारे कार्यशाळा संपन्न

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील ‘कोरपावली ग्रामपंचायत’ची ‘अटल भूजल योजने’त निवड झाल्यामुळे एकदिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

‘महाराष्ट्र शासन अटल भूजल योजना’, पाणीपुरवठा स्वच्छता विभाग संचालनालय, ‘भूजल सर्वेशन योजना, पुणे’ आणि ‘भूजल सर्वेशन विभाग यंत्रणा. जळगाव’ यांच्या वतीने हे प्रशिक्षण उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने माजी सरपंच जलील पटेल, युवा समाजसेवक मुक्तार पिरण पटेल, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या कविता कोळंबे यांची उपस्थिती होती. यावेळी या प्रकल्पाबाबत कार्यशाळेत, ‘पाण्याची बचत भविष्यासाठी किती महत्वाची आहे’ याची जाणीव करुन देत या बाबत प्रोजेक्टरद्वारे भूजल सर्वेक्षण विभाग जळगावचे मॉरिटर ट्रेनर जितेंद्र सोनवणे, क्लार्क एम.एस.डब्लू कोड, रब्बील तडवी, लिकोरर पंकज पाटील यांनी कार्यशाळा शिबीरात उपस्थितांना माहिती दिली. या योजनेत कोरपावली गावचा समावेश झाल्याने भविष्यातील होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात आली.

“ग्राम पंचायत कार्यलयासमोर गावाचा नकाशा आणि रांगोळी काढून भविष्यात लोकसभागातून शेततळे, बंधारे, बांधून खालावलेली भूजल पातळी परत कशी पूर्वपदावर येईल याबाबत आणि पावसाळ्यातील पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवून त्याचा चांगला उपयोग कसा होईल याबाबत मार्गदर्शन केले. लवकर प्रकल्प सुरू होणार असून ग्राम पंचायतचे मासिक ठराव घेण्यात येईल आणि या संपूर्ण योजनेच्या अमलबजावणीसाठी गावपातळीवर समिती स्थापन करण्यात येईल. सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गावकरी, शेतकरी सर्वांनी यात सहभागी व्हावे जेणेकरून संपूर्ण गावाचा या योजनेचा लाभ होईल” असे सांगितले

यावेळी ग्राम पंचायत सदस्य आरिफ तडवी, सत्तार तडवी, सिकंदर तडवी, ग्रामस्थ नईम पटेल, कुतबुद्दीन तडवी, नसीर पटेल, अंगणवाडी सेविका अलका महाजन, कमल महाजन, आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्रामसंघ्याच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहेते, महिला एकता ग्राम संघलिका मोनाली पाटील, कृषिसखी शुभांगी फेगडे, एकता महिला ग्रामसंघलिका सदस्या अर्चना नेहेते, विद्या फेगडे, सीआरपी ज्योस्ना अडकमोल ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी यासह अनेक महिला, पुरुष, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Protected Content