शिक्षणविभागाकडून शाळांना पाठय-पुस्तक वितरण

 

shikshan vibhag

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पुढील आठवडयात १७ जुनला सुरू होणार असुन शाळेचे परिसर मुनश्व चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजणार आहे. यासर्व शाळांना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातुन वितरीत करण्यात येणारे साहित्य-पाठयपुस्तके शाळा निहाय वितरण करण्याचे कार्य सुरु करण्यात आले आहे .

तालुक्यातील जिल्हा परिषदच्या एकुण  २०७ माध्यमिक शाळा आहेत. यातील १७० शाळा मराठी माध्यमाच्या असुन, ३८ शाळा या उर्दू माध्यमाच्या आहेत. तर अनुदानीत तत्वाखालील एकुण ३६ खाजगी शाळा आहेत, यावल तालुक्यातील माध्यमिक शाळांची संख्याही २४३ असून यातील विद्यार्थीची पटसंख्या मराठी शाळा २२ हजार ८८९ तर उर्दू शाळातील विद्यार्थी पटसंख्या ८ हजार ५४८ अशी संख्या आहे. म्हणून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांसाठी ८ हजार २३८ पुस्तके, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थांसाठी ८ हजार २६८, इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी ११ हजार २२४ पुस्तके, इयत्ता ४थीसाठी १४ हजार ७५०, इयता पाचवीच्या वर्गासाठी १७ हजार ६२२ पुस्तके, इयत्ता सहावीच्या विद्यार्थीसाठी २१ हजार ४९५, इयत्ता सातवीच्या वर्गासाठी २१ हजार ५२७ तर इयत्ता आठवीतील विद्यार्थांसाठी मिळालेली पुस्तक संख्याही २५ हजार ४२ अशी आहे.
शिक्षण विभागाकडुन प्राप्त पुस्तकांची संख्या एकुण १ लाख २८ हजार १९६ अशी आहे. याचबरोबर उर्दू माध्यमाच्या शाळासाठी प्राप्त पुस्तक संख्या ५० हजार २०५ आहे. तर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळानिहास दिले जाणारे, मासिक पोषण-आहार १ ते ५च्या विद्यार्थ्यांसाठी १८ क्विंटल ५० किलो तांदुळ तर इयत्ता ६ ते ८च्या विद्यार्थ्यांसाठी १७ क्विंटल ६२ किलो तांदुळ मिळतात, एकुण पोषण आहाराकरिता मिळणारे तांदुळ ३६ क्विंटल १२ किलो असे मिळतात.

Add Comment

Protected Content