प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चाळीसगावात संतप्त प्रतिक्रिया !

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र ग्रामीण भागात परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते. परंतु कुठल्याही प्रकारची कठोर पाहूल उचलली जात नसल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील ग्रामस्थांकडून उमटवल्या जात आहे.           

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दि. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून संपूर्ण राज्यात कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू केली आहे. पाच जणांवर गर्दी करू नये असे निर्देशन शासनाने घालून दिले आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी हि संचारबंदी पुकारण्यात आली आहे. परंतु हि संचारबंदी फक्त शहरासाठीच का? हा प्रश्न आता ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहे. कारण शहराच्या ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलिसांची तैनात केलेली आहे. कारवाई दरम्यान विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याउलट ग्रामीण भागात बिनधास्त होऊन ओट्यावर गप्पा मारताना दिसून येत आहे. 

खेडेगावात परिस्थितीचे गांभीर्य नसून कुठल्याही प्रकारची कारवाई  होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासना बरोबर गावाचे प्रमुखही झोपा काढत आहे का? असा सवाल सर्वसामान्य जनता करू लागली आहे. संचारबंदीत पाच जणांवर गर्दी करू नये म्हणून निर्देशन असताना काही खेडेगावात  सर्रासपणे मद्यविक्री व जुगारचे अड्डे हे सुरूच आहे. जास्तीत जास्त जण एकत्रित आल्यामुळे कोरोना बांधीतांची संख्या हि झपाट्याने वाढत आहे. त्यात मृत्यूच्या दरात हि वाढ झालेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन अवैध मद्यविक्री व जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content