शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन हे प्रशासनाच्या माध्यमातून होणार असून यासाठी शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या केंद्रात गणेशमूर्ती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
गणेश मूर्ती संकलन साठी शेंदूर्णी नगरपंचायत व पोलीस प्रशासनाचे संयुक्त आवाहन शेंदूर्णी प्रतिनिधी येथिल शहरातील सर्व गणेश मंडळ व भक्तांना आवाहन करण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, शासनाच्या आदेशानुसार कोविड १९ (कोरोना)या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी टाळण्यासाठी श्री गणेशाचे विसर्जन हे व्यक्तिगत न करता शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे मंडळाच्या ठिकाणीच किंवा स्वतः च्या घरातच किंवा श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रावर करावयाचे आहे.
या अनुषंगाने शेंदूर्णी शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे. सर्व गणेश भक्तांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या कडील गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून संबंधीत ठिकाणी११ ते १२ वाजे दरम्यान घरगुती व गणेश मंडळाचे मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे कृपया गणेश भक्तांनी/मंडळांनी/नागरिकांनी व्यक्तिगत/सामुहिक रीत्या विसर्जन करण्यासाठी न जाता श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरातील संकलन केंद्र शेंदूर्णी नगरपंचायत कार्यालय येथे आहे. या ठिकाणी श्री गणेशमूर्ती संकलित करण्यात येतील व संकलित मूर्ती या जमा करून विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागरिकांनी शासन,प्रशासन, पोलीस विभाग व नगरपंचायत यांना सहकार्य करावे त्याच प्रमाणे नियमांचे करणार्या गणेश मंडळावर व भक्तांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. तर, शहरातील नगरसेवकांनी आपापल्या वार्डातील गणेश मंडळे व गणेश भक्तांना आवाहन करून गणेश मूर्ती संकलनाचे ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच पहुर पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी केले आहे.