शेंदुर्णी कोरोना लसीकरण केंद्रावर अतिरिक्त डोस उपलब्ध करा; नागरीकांची मागणी

शेंदूर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । शेंदुर्णी शहराला परिसरातील १० खेडेगाव जोडले असल्याने येथील लसीकरण केंद्रावर कमी डोस उपलब्ध असून आणि नागरीकांची मोठी गर्दी होते. तरी प्रशासनाने लसीकरण केंद्रावर अतिरिक्त कोरोना डोस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे. 

शेंदुर्णी  शहराची प्रौढ मतदार संख्या २० ते २२ हजाराच्या घरात असून आजू बाजूला असणाऱ्या एकूण १० बारा खेड्यातील नागरिक मिळून हीच संख्या ३५ हजाराचे घरात पोहचते. सद्यस्थितीत नवनिर्मित शेंदूर्णी नगरपंचायतचे स्वतःचे आरोग्य केंद्र नाही शेंदूर्णी व परिसरातील सर्व खेड्यातील नागरिकांना कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राशीवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. अश्या स्थितीत शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आजपर्यंत ६९९० नागरिकांना लस देण्यात आली आहे. ही संख्या लसीकरणास पात्र नागरिकांच्या एकूण संख्येच्या १८ टक्के आहे. लसीकरण मोहीम अशीच सुरू राहिल्यास परिसरातील नागरिकांचे लसीकरण २ वर्षांत पण पूर्ण होणार नाही. येथील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाल्यास शेकडो नागरिक सकाळी ५ वाजेपासून टोकन मिळवण्यासाठी लाईनीत उभे राहतात. मात्र जिल्हा प्रशासनाकडून  १०० किंवा १५० उपलब्ध होतात, अश्या वेळी लाईनीत उभे राहून सुध्दा नागरिकांना लसीकरण उपलब्ध होत नसल्याने नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांना दोष देतात. चांगल्या प्रकारची सुविधा देऊनही प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचे धनी व्हावे लागते. म्हणून त्यांचेही खच्चीकरण होते,  येथील लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी वेळेवेळी शेंदूर्णी व परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणात  कोशिल्ड किंवा कोवॅक्सिंन कोरोना प्रतिबंध लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदरची मागणी दुर्लक्षित केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content