आमदारांना धमकावले जातेय, त्यांचे फोन टॅप केले जाताय ; केंद्रीय मंत्री शेखावत यांचा आरोप

जयपूर (वृत्तसंस्था) निवडून आलेल्या आमदारांना शेळ्या, मेंढ्यासारखं हाकललं जात आहे. आमदारांना धमकावलं जात आहे, त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

 

 

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजस्थानातील गेहलोत सरकार आपल्या गटातील आमदारांचेच फोन टॅप करत असल्याचा आरोप शेखावत केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. तसेच गेहलोत यांनी प्रदेश काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर जैसलमेरच्या हॉटेलमध्ये बंद असलेल्या आमदारांचे फोन टॅपिंग, इंटरकॉम टॅपिंग करण्यात येत आहे. याशिवाय हॉटेलमध्ये मोबाईल जॅमर देखील लावण्यात आला असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे. आपापसात अविश्वास असेल तर मग सरकार राजस्थानात अस्तित्त्वात नाही हे स्पष्ट आहे. केवळ एका व्यक्तीच्या सत्तेच्या लोभासाठी हुकूमशाही चालू आहे, असा आरोप शेखावत यांनी केला आहे.

Protected Content