योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत.

 

‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत. सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Protected Content