विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून होणार सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

 

 

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत मंगळवारी रात्री मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा १५ ऑगस्टनंतर होणार आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे कळते.

Protected Content