Home आरोग्य देशात गेल्या २४ तासांमध्ये ६१ हजार ५३७ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद !

देशात गेल्या २४ तासांमध्ये ६१ हजार ५३७ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद !

0
29


मुंबई (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांमध्ये ६१ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ९३३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

 

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. तर आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट ६७.६२ टक्के आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्णांवर करोनावर मात केली आहे. सहा लाख १९ हजार ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.


Protected Content

Play sound