केरळ विमान अपघातातील मृतांचा आकडा १८ वर पोहचला !

काोझिकोड (वृत्तसंस्था) केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातातील मृतांचा आकडा १८ वर पोहचला आहे. विमान दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून या अपघातात दोन पायलटचाही मृत्यू झाला. तर १७० लोकांचा वाचवण्यात आले आहे.

 

एअर इंडियाचं विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती. ज्यात १७४ प्रवाशी, १० मुलं, ४ केबिन क्रू आणि २ पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळे विमान कोझिकोड रनवेवरुन घसरले आणि ३५ फुट खाली कोसळले. एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले. दुसरीकडे दिल्लीवरून एअर इंडियाचे एक विमान तपास पथक घेऊन कोझिकोड येथे पोहोचले असून पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसचे एक विशेष विमान मुंबईवरून पाठवण्यात आले आहे. दरम्यान, बचाव पथकांनी रात्री ११ वाजेपर्यंत विमानात अडकलेल्या सर्वांची सुटका केली होती.

 

Protected Content