धरणगाव, कल्पेश महाजन। जळगाव जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला असून जिल्हा रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरु होतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होकारानंतरच शाळा सुरु करता येणार असल्याचे माध्यामिक शिक्षणाधिकारी बी. जे..पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शाळा सुरू करण्यासाठी १५ जून रोजी महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरनुसार शाळा सुरू करण्यात यावा. त्याचबरोबर एखादी शाळा ग्रामीण भागात असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल यांना विचारूनच शाळा सुरू करण्यात यावा. शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे कारण त्या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा व भवितव्याचा विषय असून आपण दखल घेऊन व काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात यावे असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी व्यक्त केले.
गावांत कोरोना बाधित रुग्ण नसला तरच शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्ग वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात यावा असा जीआर महाराष्ट्र राज्य शासनाने काढला आहे. एक जुलैपासून ग्रामीण भागात अटी-शर्तीनुसार शिक्षण सुरू केले जाणार आहे. तालुक्यातील शिक्षक अपडाउन करत असतात. यात खाजगी शाळा, आश्रम शाळा या विभागाच्या शाळा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसून येत आहेत असे शिक्षण विभागाने कळविले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शाळेतील शिक्षकांच्या ड्युटी या ठिकाणी रेशन दुकान असेल किंवा गावातील चौफुली असतील चौक असतील या ठिकाणी शिक्षकांच्या डिवट्या प्रशासनाने लावताना दिसून येत होते. शाळा सुरू झाल्या तर याठिकाणी प्रत्येक विद्यार्थी बाहेर गावातील येणारे शिक्षक यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. याठिकाणी एखाद्या शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यास लहान वयोगटातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम लवकरात लवकर दिसून येऊ शकतो अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मास्क लावून शिक्षक शिकवणार कसे…
एक जुलैपासून नववी, दहावी, बारावी शिक्षण सुरू होणार असून शाळेत शिक्षक मास्क लावून शिकवणार कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. शिक्षकांना त्याठिकाणी विद्यार्थ्यांसमोर अध्ययन करणे आवश्यक असते. या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात ८११ शिक्षकांनी पाहिजे ७२८ बाहेरगावाहून शाळेत अप-डाऊन करत असतात. धरणगाव तालुक्यात माध्यमिक शाळा ३६ तर प्राथमिक शाळा ९१ आहेत. या शाळेत पारोळा, अमळनेर, चोपडा, जळगाव इतर ठिकाणाहून येणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात माध्यमिक व प्राथमिक शाळा मिळून एकूण १११ शिक्षक असून त्यापैकी ७२८ शिक्षक अप-डाऊन करत असणार फक्त त्यांचे शिक्षक या ठिकाणी शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रहात असतात. अपडाऊन करत असताना एखाद्या शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थी व शाळेतील शिक्षक यांच्यावर देखील होऊ शकतो….?
विद्यार्थी पालक व शिक्षक हे सध्या प्रत्येक शाळेत शालेय शिक्षण समितीमार्फत पालक शिक्षक सभा घेतल्या जात असून या ठिकाणी शिक्षक व पालक संभ्रम कायम दिसून येत आहे. पालकांनी तर आपल्या आपल्या मुलांना शाळेत पाठवले तर त्यांच्यात भीती मात्र कायम दिसून येत आहे. जर शाळा सुरू झाल्यात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना एका बेंचवर एक विद्यार्थी व एक मीटरचे अंतर ठेवून म्हणजे एक बेंच सोडून एक विद्यार्थी बसू शकेल अशी बैठक व्यवस्था शिक्षक व पालक करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर जर समजा शाळेत ६० विद्यार्थी असतील तर ३० विद्यार्थी आज आणि ३० विद्यार्थी उद्या म्हणजे याठिकाणी ६० विद्यार्थ्यांमध्ये दोन गट गटागटाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार आहे. आठवडाभराची नियोजन शिक्षक मुख्याध्यापक संघ करताना दिसून येत आहेत. आता मात्र या ठिकाणी तालुक्यात किंवा जिल्ह्यात इंग्लिश मीडियम स्कूल असतील तर ते विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्हिडिओ कॉल एप्लीकेशन यामार्फत ऑनलाईन शिक्षण पद्धती देण्याचे काम त्या ठिकाणी करतांना दिसून येत आहे व इंग्लिश मीडियम स्कूल असतील किंवा प्राथमिक माध्यमिक शाळा याठिकाणी ऍडमिशन ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत.