धरणगाव तालुक्यात आज पुन्हा ४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात आज पुन्हा ४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील १, तर पाळधी खुर्द येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात पुन्हा ४ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील हनुमान नगर १ तर पाळधी खुर्द येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा  तालुक्यात १२ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यात धरणगाव शहरातील ४, झुरखेडा १ तर पाळधी खुर्द येथील ७ रुग्णाचा समावेश होता. दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या ४ रूग्णांमुळे तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १६६ इतकी झाली आहे. यातील १३ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत ९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ४६ रुग्ण उपचार घेत आहेत.

Protected Content