Home Cities जामनेर वृक्षारोपण करूनच वाढदिवस साजरे करा ; शरद बेलपत्रे

वृक्षारोपण करूनच वाढदिवस साजरे करा ; शरद बेलपत्रे

0
24

 

पहूर ता.जामनेर. प्रतिनिधी । केवळ व्हॉट्सअप , फेसबूकवर शुभेच्छा संदेश पाठवून वाढदिवस साजरे न करता वृक्षारोपण करून वाढदिवस साजरे करा असे आवाहन शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे यांनी केले .

पहूर शहर पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे यांचा वाढदिवस रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला वृक्षारोपण करून साजरा केला. याप्रसंगी शरद बेलपत्रे यांनी पुढे सांगितले की, पाश्चात्त्य संस्कृतीनूसार नूसतेच केक कापून व नृत्य करीत धांगडधिंगा न करता वृक्षारोपण, रक्तदान यासारखे राष्ट्रीय उपक्रम राबवून वाढदिवस साजरे केले पाहीजे. यापूढे संघटनेचे सदस्य व मित्रांचे वाढदिवस किमान पाच झाडे लावूनच साजरे करूया असेही ते म्हणाले. याप्रसंगी रामेश्वार पाटील , उप सरपंच शाम सावळे ,कोरोना योद्धे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी पूष्कराज नारखेडे , डॉ. संदीप कुमावत , डॉ. जितेंद्र वानखेडे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे , उपाध्यक्ष रवींद्र घोलप दै दिव्य मराठीचे चिफ हेड यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य मनोज जोशी , रविंद्र लाठे , संभाजी क्षिरसागर , सादिक शेख , यांचेसह सांबा विभागाचे चौधरी , शिक्षक बी. बी. पाटील , अशोक सुरवाडे, ज्ञानेश्वर पवार ,विजय माहोरे , सुहास बेलपत्रे , विशाल जाधव , सौरभ बेलपत्रे ,गणू पाटील उपस्थित होते. .


Protected Content

Play sound