Home राजकीय ३ ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन-मुख्यमंत्री

३ ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन-मुख्यमंत्री

0
64


मुंबई प्रतिनिधी । राज्य विधीमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.

येत्या ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण लॉकडाऊनमुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते. दरम्यान ३ ऑगस्टपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन नेमके किती दिवस चालणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली नसली तरी यंदाचे पावसाळी अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound