जळगावकरांच्या जीवनाशी खेळू नका ; महापौरांचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराबाबत वारंवार ओरड होत आहे. एक कोरोना पॉझिटिव्ह वृद्धा रुग्णालयाच्या शौचालयात ५ दिवसांनी मृत आढळून आली. आजच्या घटनेला कारणीभूत ठरल्याने डीनसह ७ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कारवाईचे गाजर दाखवून जळगावकरांच्या जीवनाशी खेळ करू नये असा इशारा महापौर सौ. भारतीताई सोनवणे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूदर कमी व्हावा, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या अशी आमची अपेक्षा असल्याचे महापौर सौ. भारतीताई सोनवणे यांनी सांगितले. राज्य सरकारने कठोर पाऊले उचलून जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून सुधारणा करावी. आपली जबाबदारी ओळखून आजच कामाला लागा. लॉकडाऊन काळात नागरिकांच्या भल्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून प्रश्न रेटून धरण्यास आम्हाला भाग पाडू नका असा असा इशाराही महापौर सौ. सोनवणे यांनी दिला आहे.

Protected Content