रामेश्वर कॉलनीत वृध्दाच्या हातातील नोटांचे बंडल घेवून दुचाकीस्वार पसार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत एका वृध्दाच्या हातातून साडे नऊ हजार रूपये अज्ञात तरूणाने हिसकावून दुचाकीवरून पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरून येथील रहिवाशी भास्कर विठ्ठल लाडवंजारी (वय-६७) हे पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. त्यांचे रामेश्वर कॉलनीतील लक्ष्मी नगरात हार्डवेअरचे दुकान असून दुकानाच्या बाजूला त्यांच्या मुलगा रघुनाथ लाडवंजारी याचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. ११ नोव्हेंबर रेाजी नेहमीप्रमाणे भास्कर लाडवंजारी यांनी दुकान सकाळी ८ वाजता उघडले. त्यानंतर ते दुचाकीचे खराब झालेले दुचाकीचे लॉक घेण्यासाठी पायी जात असतांना त्यांच्या जवळ एक अनोळखी ४० वर्षी तरूण दुचाकीवर आला. त्याने सांगितले की, बाबा तुम्हाला दुचाकीने हार्डवेअर दुकानावर सोडून देतो असे सांगितले. त्यानंतर भास्कर लाडवंजारी दुचाकीवर बसले थोड्या वेळानंतर तरूणाने दुचाकी थांबवून दोन हजाराची नोट काढून सुटे आहेत मागितले असता सुटे देण्यासाठी भास्कर लाडवंजारी यांनी खिशातील १०० रूपयांचे बंडल काढले. त्याचवेळी दुचाकी धारकाने त्यांच्या हातातील ९ हजार ५०० रूपयांचे बंडल हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी भास्कर लाडवंजारी यांनी रविवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी धाव घेवून अनोळखी तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्‍या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content