समता नगरात रिपाइंतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील समता नगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आणि  आदेश फिटनेस अड वेलनेस सेंटर  यांच्या संयुक्त विद्यमानाने माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्याहस्ते मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

 

माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने समता नगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्याहस्ते माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटतर्फे विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले.

 

याप्रसंगी शारदा अडकमोल संगिता अडकमोल, उज्वला अडकमोल, शोभा साळवे, माया सोनवणे, ललिता अडकमोल, प्रतिभा खरोटे, आशा बाविस्कर, मनिषा बाविस्कर, ममता सोनवणे, जयश्री सोनवणे, सोनाली अडकमोल, कामिना अडकमोल, पिनू खरोटे, रुपाली बनसोडे, मंगला लोढे,  मनिषा भालेराव, नंदनी ढिलोरे, मनिषा सपकाळे, संगिता भालेराव, अर्चना वानखेडे, प्रमिला तायडे, नंदा सोनवणे, सुमन इंगळे, प्रतिभा शिरसाळ, सुनंदा सोनजे, दादाराव अडकमोल, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, सागर सपकाळे, नरेद्र मोरे, भिमराव सोनवणे, अनिल लोढे, बापू धामणे, रमेश सोनवणे, आकाश चौधरी, प्रशांत सोनार, अशरफ खान आदी उपस्थित होते.

Protected Content